Monika Shinde
जर पावसाळ्यात तुमचे ओठ कोरडे पडत असतील किंवा फाटत असतील, तर अशावेळी तुम्ही घरच्या घरी हे सोपे उपाय करू शकता
रोज झोपण्यापूर्वी ओठांवर तूप लावून झोपल्याने तुमचे ओठ मुलायम होतात
खोबरेल तेल आणि मध यांचे मिश्रण ओठांवर लावल्याने कोरडेपणा दूर होतो आणि ओठ मऊ व पोषणयुक्त राहतात. यामुळे ओठांना नैसर्गिक ओलावा मिळतो.
लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओठांवर लावल्यास ओठांचा काळसरपणा कमी होतो. हा उपाय नियमित केल्यास ओठ हलक्या गुलाबी छटेत दिसायला लागतात.
गुलाबाच्या पाकळ्या थोड्या दुधात भिजवून त्याचा पेस्ट बनवून ओठांवर लावा. यामुळे ओठांना सौम्य गुलाबी रंग येतो आणि मऊपणा टिकतो.
२ थेंब ग्लिसरीन पाण्यात मिसळून दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा. यामुळे ओठ नरम, हायड्रेटेड आणि उजळ राहतात.
एक चमचा साखर आणि एक चमचा मध मिक्स करून ओठांवर सौम्यपणे मसाज करा. हे नैसर्गिक स्क्रब मृत त्वचा दूर करतं आणि ओठ पुन्हा ताजे व आकर्षक दिसू लागतात.