सकाळ डिजिटल टीम
जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ किनारपट्टीला दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात आला. सामान्यत: जूनच्या मध्यापर्यंत भारताचा बहुतांश भाग व्यापणाऱ्या मान्सूनची वाटचाल थांबली आहे.
monsoon
Esakal
सॅटेलाइट फोटोंनी भारताची चिंता वाढवली असून मध्य, पश्चिम भारतासह इतर भागातून मान्सूनचे ढग दिसेनासे झाले आहेत.
monsoon
Esakal
मान्सून १ जूनला केरळात तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रासह ओडिशा, बंगाल, बिहारच्या दिशेनं वाटचाल करतो. पण यंदा एल निनोचं संकट उभा ठाकलं आहे.
monsoon
Esakal
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतात ६५ टक्के कमी पावसाची नोंद झालीय. महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह काही राज्यात पाऊस नसल्यासारखी स्थिती आहे.
monsoon
Esakal
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार न झाल्यानं मान्सूनची वाटचाल थांबली आहे. हा पट्टा समुद्रातील आर्दता देशातील अंतर्गत भागात नेण्याचं काम करतो.
monsoon
Esakal
उत्तर भारतात पश्चिमी चक्रावाताचा मान्सूनच्या वाऱ्याच्या दिशेवर परिणाम झाला आहे. तर अल निनोसुद्धा सक्रीय झाला आहे.
monsoon
Esakal
जून ते सप्टेंबर पर्यंत एल निनोची स्थिती होऊ शकते असा इशारा IMDने दिलाय. या काळात कमी पावसाची शक्यता आहे.
monsoon
Esakal
हवामान तज्ज्ञांच्या मते मॉन्सूनची वाटचाल थांबणं, सॅटेलाइट फोटोंमध्ये ढगांची कमतरता, अल निनोची परिस्थिती सोबतच येणं चिंतेचं आहे.
monsoon
Esakal