सकाळ वृत्तसेवा
भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले आहे की, यंदा मान्सून नेहमीच्या वेळेआधीच दाखल झाला आहे. तो सामान्यतः जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो.
IMD ने २७ मेपर्यंत मान्सून येण्याची शक्यता वर्तवली होती, पण तो २४ मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमान, हवेचा दाब आणि हवामानातील बदलांमुळे मान्सूनने लवकर हजेरी लावली.
हा एक गैरसमज आहे! मान्सून लवकर आला म्हणजे तो लवकर जाईलच असे नाही.
समुद्राचे तापमान, वाऱ्याचा वेग आणि वातावरणातील दाब या घटकांवर पावसाळा किती दिवस टिकेल हे अवलंबून असते.
तज्ञांनुसार, मान्सून लवकर आल्याने पावसाचे प्रमाण सामान्य ते चांगले राहण्याची शक्यता आहे.
अल नीनोमुळे समुद्राचे तापमान ३-४°C वाढते, ज्यामुळे काही ठिकाणी कमी तर काही ठिकाणी जास्त पाऊस होतो. ला नीनामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असते.
२००९ नंतर यंदा पहिल्यांदाच मान्सून इतक्या लवकर दाखल झाला आहे.