पुजा बोनकिले
पावसाळा सुरू होताच अनेक आजार निर्माण होतात.
अशावेळी पावसाळ्यात कसं वागावं हे जाणून घेतले पाहिजे.
जास्त जोरदार पावसात शक्यतो घराबाहेर पडू नका.
पहिल्या पावसात आनंदात भिजणे वेगळे; पण ऐन पावसाळ्यात वारंवार ओले होणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.
बाहेरून आल्यावर ओले शरीर पुसून कपडे लगेच बदलावेत.
पाय काळजीपूर्वक कोरडे करावेत. अन्यथा पाय सतत ओलसर राहिल्याने बोटांच्या बेचक्यात चिखल्या होऊ शकतात.
ओले झालेले केस नीट वाळवावेत. दमट हवेमुळे जर ते नीट वाळले नाहीत, तर त्यात उवा - कोंडा होऊ शकतात. तसेच, सर्दी, डोकेदुखीलाही निमंत्रण मिळते.
पावसाळ्यात वाळलेले कपडे घालावेत. ओलसर कपड्यांमुळे खाज सुटू शकते.