Monika Shinde
पावसाळा म्हणजे हिरवाई, धबधबे आणि धुंद हवामान! या सुंदर ऋतूत फिरायला जायचंच असेल, तर महाबळेश्वर ते माळशेज घाट सर्वोत्तम!
धुक्याने भरलेले पर्वत, थंड हवामान आणि स्ट्रॉबेरीचे मळे! महाबळेश्वर पावसात अजूनच जिवंत होतं रोमहर्षक निसर्ग अनुभवायला विसरू नका.
महाबळेश्वर जवळचा प्रतापगड किल्ला पावसाळ्यात धुक्याच्या वेढ्यात हरवलेला वाटतो. इतिहासप्रेमींसाठी आणि ट्रेकर्ससाठी खास ठिकाण.
महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर असलेलं पाचगणी हे ठिकाण, थोडं शांत, पण तितकंच रमणीय. वॉक्स, पॉईंट्स आणि निसर्गदृश्यं तुमचं मन मोहून टाकतील.
महाबळेश्वरहून पुढे वेंगणूरकडे वळा थोडंसं हटके ठिकाण. येथे जंगलसदृश वातावरण आणि धबधब्यांचे सौंदर्य अवर्णनीय असतं.
घाटात शिरताच दर दोन मिनिटांनी नवीन धबधबा! धुके, गार वारा आणि पावसाचे थेंब माळशेज हे ट्रेकर्स आणि फोटोग्राफर्ससाठी परफेक्ट.
महाबळेश्वर ते माळशेजच्या रस्त्यावर असंख्य पॉईंट्स, गावं आणि निसर्गाचे सुंदर क्षण. प्रत्येक ठिकाणी फोटो काढावासा वाटतो.