Monika Shinde
पावसाळा आला की त्वचा ओलसर, चिकट किंवा निस्तेज होते. पण योग्य सवयी ठेवल्यास त्वचा राहू शकते तितकीच सुंदर. जाणून घ्या हे ७ सोपे उपाय!
पावसाळ्यात चेहऱ्यावर तेलकटपणा वाढतो. हर्ष क्लींझर टाळा आणि सौम्य फेसवॉश वापरा. यामुळे त्वचा स्वच्छ राहते आणि मुरुमांची शक्यता कमी होते.
पावसाळ्यात भारी क्रीम्स टाळा. त्याऐवजी हलकं, जेल-बेस्ड मॉइश्चरायझर वापरा. हे त्वचेला थंडावा देतं आणि तेलकटपणा टाळतं.
ओल्या हवामानात चेहऱ्यावर वारंवार हात लावल्याने जीवाणूंचा प्रसार होतो. त्यामुळे त्वचेला इंफेक्शन आणि मुरुमांचा त्रास होऊ शकतो.
पावसात रोगप्रतिकारक शक्ती टिकवण्यासाठी हर्बल चहा उपयुक्त. झोप पूर्ण झाली की त्वचेवर ते थेट झळकते फ्रेश, तजेलदार आणि नितळ
आठवड्यातून एकदाच सौम्य स्क्रब वापरा. पावसाळ्यात स्किन सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे जास्त स्क्रबिंग टाळा अन्यथा रॅशेस होऊ शकतात.
हळद, मध आणि दही यांचा फेसपॅक त्वचेला नैसर्गिक चमक देतो. रासायनिक प्रॉडक्ट्स टाळा आणि घरचं सौंदर्य स्वीकारा.
कोणताही उपाय एकदाच करून उपयोग होत नाही. दिवसाची सुरुवात आणि शेवट योग्य स्किन केअरने करा. तुमची त्वचा तुमची काळजी लक्षात ठेवेल