Shubham Banubakode
मेघालयाची राजधानी शिलाँगमध्यै शिलाँग व्ह्यू पॉइंट, लेडी हायडारी पार्क, आणि एलिफंट फॉल्स अशी ठिकाणं आहेत. तुम्ही इथे बोटिंगचाही आनंद घेऊ शकता.
जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चेरापूंजीला पावसाळ्यात भेट देणे अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.
आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाणारे मावलिननॉन्ग पावसाळ्यात हिरव्या रंगाने नटलेले दिसते. येथील लिव्हिंग रूट ब्रिज आणि बांबूपासून बनवलेली घरे पाहण्यासारखी आहेत.
चेरापूंजी जवळील हा धबधबा, ज्याला “सेव्हन सिस्टर्स फॉल्स” असेही म्हणतात. हा धबधबा पावसाळ्यात पाहण्यासारखा असतो. हा धबधबा निसर्गप्रेमींसाठी आकर्षण आहे.
शिलाँगपासून जवळ असलेले लैटलम कॅनियन पावसाळ्यात धुक्याने आणि हिरव्या रंगाने नटलेले दिसते. येथून डोंगर आणि खोऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
चेरापूंजी जवळील नोंग्रीआट गावातील हा अनोखा पूल पावसाळ्यात हिरव्या जंगलात आणि धबधब्यांमध्ये अधिक सुंदर दिसतो. अनुभव अविस्मरणीय आहे.
मावफ्लांग जंगलातील जैवविविधता आणि शांतता निसर्गप्रेमींसाठी आकर्षक आहे. स्थानिक खासी संस्कृती जाणून घेण्यासाठीही हे ठिकाण उत्तम आहे.