पावसाळ्यात गोव्याच्या नयनरम्य धबधब्यांचा आनंद घ्या

Monika Shinde

गोवा

गोवा म्हटलं की आठवतो समुद्रकिनारा आणि पार्टी लाईफ…पण पावसाळ्यात गोवा वेगळाच रुप धारण करतो हिरवागार जंगल, धुक्याची चादर आणि धबधब्यांची सैर!

Goa | Esakal

जंगलात लपलेले रत्न

पावसाळा सुरू झाला, की गोव्यातील डोंगर-दऱ्यांमध्ये लपलेले अनेक अप्रसिद्ध धबधबे प्रकट होतात. हे ठिकाणं ट्रेकर्स, साहसप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी खूप खास आहेत.

Hidden gem in the forest | Esakal

हिवरे धबधबा

घनदाट जंगलातून जावं लागतं, पण जेव्हा तुम्ही हिवरे धबधब्याजवळ पोहोचता, तेव्हा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. हा ट्रेक थोडा कठीण असला तरी नजारा अप्रतिम!

Hiware Waterfall | Esakal

तांबडी सुर्ला

प्राचीन तांबडी सुर्ला मंदिराजवळचा हा धबधबा निसर्गाचं सौंदर्य आणि इतिहासाचा वारसा एकत्र अनुभवायला मिळवून देतो. शांत, नितळ आणि मनाला स्पर्शणारा.

Tambadi Surla | Esakal

दूधसागर

चार टप्प्यांत खाली कोसळणारा हा विशाल धबधबा, खासकरून ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटामुळे प्रसिद्ध आहे. पण प्रत्यक्षात पाहिल्यावर तो आणखीनच भव्य वाटतो.

ocean of milk | Esakal

उंच धबधबा

गोवा-कर्नाटकच्या सीमेवर असलेला हा धबधबा तब्बल 130 मीटर उंचीवरून धबधधब करत कोसळतो. आवाज, धुके आणि पाण्याचा जोर सगळं मंत्रमुग्ध करणारं!

High waterfall | Esakal

अरवलेम धबधबा

धबधब्याच्या शेजारी रुद्रेश्वर मंदिर आणि प्राचीन गुहा असलेला हा भाग एक वेगळा अनुभव देतो मन शांत करणारा आणि डोळ्यांना सुखावणारा.

Aravalem Waterfall | Esakal

नेत्रावली

नेत्रावली धबधबा पश्चिम घाटात वसलेला असून, येथे अनेक दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर याला पर्याय नाही.

Netravali | Esakal

पावसाळ्यात ओठ फाटण्यापासून वाचण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

येथे क्लिक करा