पावसाळ्यात उगवणारी 'ही' दुर्मिळ रानभाजी डायबेटीसवर आहे गुणकारी, फायदे जाणून व्हाल थक्क

Yashwant Kshirsagar

निसर्गाचे वैशिष्ट्य

निसर्गात अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांचे अनेक औषधी गुणर्धम आहेत मात्र बऱ्याच लोकांना माहित नाहीत.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

पावसाळा

सध्या पावसाळा सुरु आहे. या हंगामात अनेक रानभाज्या निसर्गात आपोआप उगवतात ज्या आपल्या आरोग्यासाठी खूर फायदेशीर असतात, त्यांच्याविषयी अनेकांना माहिती नाही.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

कडवंची

आपल्या महाराष्ट्रात विशेषत: पुणे सातारा सांगली सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांत एक औषधी रानभाजी उगवते जी कडवंची या नावाने ओळखली जाते. मधुमेहींसाठी ही रानभाजी खूप फायदेशीर आहे.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

कालावधी

पावसाळा सुरू झाला की या भाजीचे वेल सर्वत्र दिसतात. ही एक वेलवर्गीय भाजी आहे. या वेलीला सुंदर सुंदर अशी पांढरी फुले येतात. पावसाळा संपला की या भाजीचे वेल वाळून जातात. वेलीच्या शेंगा अथवा बिया हा प्रकार खाण्यायोग्य मानला जातो.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

चव

थोडीशी कडवट चवीची ही रानभाजी पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

रक्तातील साखर नियंत्रण

कडवंचीमध्ये नैसर्गिकरित्या रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म असतात.त्यामुळे मधुमेहींसाठी ही भाजी एक प्रकारे वरदानच आहे.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

इन्सुलिनची कार्यक्षमता

या भाजीच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे साखर अचानक वाढत नाही.ही भाजी उत्तम नैसर्गिक 'डिटॉक्सिफायर' आहे. ती यकृताची स्वच्छता करते आणि पोट साफ ठेवण्यास मदत करते.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

विटामिन्स

या रानभाजी मध्ये अनेक विटामिन्स आणि मिनरल्स असतात प्रामुख्याने विटामिन बी आणि सी मोठ्या प्रमाणात असतात यामध्ये लोह सुद्धा असते..

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

अनेक आजारांवर गुणकारी

अशक्तपणा असेल तोंडाला चव नसेल तेव्हाही ही भाजी प्रामुख्याने खायला दिली जाते कावीळ,पोटाचे विकार, पोट साफ होण्यासाठी,रोगप्रतिकारक शक्ती, डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो.

Kadwanchi Diabetes Natural Remedy

|

esakal

उपवासात जांभूळ का खात नाहीत? फक्त आध्यात्मिक नाही तर वैज्ञानिक आहे कारण

Why Avoid Jamun in Fasting

|

esakal

येथे क्लिक करा