Yashwant Kshirsagar
भारतीय संस्कृतीत उपवास हा अन्नत्याग नसून आत्मशुद्धी, इंद्रियनिग्रह आणि परमचैतन्याकडे जाण्याचा आध्यात्मिक प्रवास आहे. शरीर आणि मन शांत ठेवण्याचा हा सोहळा आहे.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
प्रसिद्ध अध्यात्म संशोधक रघुनाथ येमुल (गुरुजी) यांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक कुटुंब आणि परंपरांमध्ये उपवासाच्या दिवशी जांभूळ खाणे टाळले जाते. हा नियम केवळ अंधश्रद्धा नसून धार्मिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक विचारांचा सुंदर संगम आहे.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
पुराणांमध्ये पृथ्वीला “जम्बूद्वीप” म्हटले आहे. हे नाव विशाल जम्बू वृक्षांवरून पडले. जम्बू वृक्ष हे भौतिक जीवन, स्थैर्य आणि देहधर्माचे प्रतीक मानले जाते.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
उपवासाचा मुख्य हेतू देहभावातून आत्मभावाकडे जाणे हा आहे. जांभूळ टाळून साधकाला भौतिकतेपासून दूर होऊन आध्यात्मिकतेकडे वळवण्याचा सूक्ष्म संदेश दिला जातो.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
“उपवास” शब्दाचा अर्थच आहे ईश्वराजवळ राहणे. उपवासात शरीर हलके, मन शांत आणि चित्त अंतर्मुख ठेवणे महत्त्वाचे असते.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
प्राचीन ऋषी-मुनी आहाराला साधनेचा भाग मानत. आवडते फळ जाणीवपूर्वक टाळणे हे रसना, इच्छा आणि आसक्तीवर नियंत्रण मिळवण्याचे एक साधन आहे.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
योग आणि ध्यान परंपरेत शरीरातील प्राणशक्ती संतुलित ठेवणे महत्त्वाचे. जांभूळ हे कषाय गुणधर्माचे फळ असल्याने काही साधना परंपरांमध्ये ते उपवासात टाळले जाते.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
जांभूळात anthocyanins, polyphenols, flavonoids, ellagic acid आणि jamboline सारखे घटक असतात. हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
उपवासात ग्लुकोजची उपलब्धता कमी असते. अशा वेळी जांभूळाचे सेवन काही व्यक्तींमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे किंवा ऊर्जा कमी होण्याची शक्यता वाढवू शकते. म्हणून लोकानुभवातून हा नियम विकसित झाला.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
जम्बू वृक्षाला आध्यात्मिक महत्त्व आहे. बौद्ध परंपरेतही त्याच्या सावलीत ध्यानाचे उल्लेख आहेत. “उपवासात जांभूळ टाळा” हा नियम धर्म, आयुर्वेद, योग आणि विज्ञान यांच्या एकत्रित निरीक्षणातून निर्माण झालेली समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे.
Why Avoid Jamun in Fasting
esakal
Who Should Avoid Jamun
esakal