भारतीय नोटांवर छापलेली ऐतिहासिक ठिकाणे कोणती आणि 'ती' का छापली आहेत?

सकाळ डिजिटल टीम

सांस्कृतिक-ऐतिहासिक महत्त्व

चलनी नोटा फक्त व्यवहाराचे माध्यम नसून देशाच्या गौरवशाली इतिहास आणि वास्तुकलेचा संदेश दररोज कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.

History of Indian Currency Notes

|

sakal

१० रुपयांची नोट 'कोणार्क सूर्य मंदिर'

ओडिसातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर १२५० CE मध्ये बांधले गेले असून 'कोण' (कोन) आणि 'अर्क' (सूर्य) या दोन शब्दांपासून याचे नाव तयार झाले आहे.

History of Indian Currency Notes

|

sakal 

२० रुपयांची नोट 'कैलास मंदिर'

ई.स. ७६० मध्ये राजा प्रथम कृष्ण याने वेरुळ येथे माउंट कैलाससारखे कैलास मंदिर २ लाख टन खडकातून फक्त छिन्नी-हतोड्याने कोरून उभारले.

History of Indian Currency Notes

|

sakal

५० रुपयांची नोट 'हंपीचा दगडी रथ'

विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय यांनी कोणार्कच्या रथावरून प्रेरणा घेऊन कर्नाटकातील हंपी येथे हा भव्य दगडी रथ उभारला होता.

History of Indian Currency Notes

|

sakal

१०० रुपयांची नोट 'राणी की वाव'

गुजरातच्या पाटणमधील ही प्रसिद्ध पायऱ्यांची विहीर (स्टेपवेल) तिच्या उलट्या मंदिराच्या आकार रचनेमुळे २०१४ मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ बनली.

History of Indian Currency Notes

|

sakal 

२०० रुपयांची नोट 'सांची स्तूप'

मध्य प्रदेशातील इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकातील सांची स्तूप हा भगवान बुद्धांच्या जीवनप्रसंग आणि कथा सांगणाऱ्या अद्भुत कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे.

History of Indian Currency Notes

|

sakal

५०० रुपयांची नोट 'लाल किल्ला'

दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला सुरुवातीला पांढऱ्या रंगाचा होता, पण नंतर पांढरा दगड निघू लागल्याने ब्रिटिशांनी त्याला लाल रंग दिला.

History of Indian Currency Notes

|

sakal 

२००० रुपयांची नोट 'मंगळयान'

इस्रोचे पहिले मंगळयान २४ सप्टेंबर २०१४ ला मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले, ज्यामुळे भारताच्या अंतराळ मोहिमेला जागतिक ओळख मिळाली.

History of Indian Currency Notes

|

sakal 

वारसा

भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटांवर केवळ स्वातंत्र्यसैनिकांची चित्रे न ठेवता देशाच्या समृद्ध वास्तुकला अन् विज्ञानाचा ऐतिहासिक वारसा दर्शवला आहे.

History of Indian Currency Notes

|

sakal 

वैशिष्ट्ये

नोटांवरील ही सर्व चित्रे भारताची प्राचीन वास्तुकला, धर्म, इतिहास आणि आधुनिक अंतराळ क्षेत्रातील प्रगतीची उत्तम प्रतीके मानली जातात.

History of Indian Currency Notes

|

sakal 

जगात कबुतरांच्या किती प्रजाती आहेत? पाळीव कबुतरांचा इतिहास काय?

How Many Pigeon Species Exist?

|

sakal 

आणखी वाचा