तूर, मूग की चणा? आरोग्यासाठी सर्वात ‘बेस्ट’ डाळ कोणती?

Aarti Badade

डाळींचा आहार आणि आरोग्य

भारतीय आहारात डाळींना प्रथिनांचा मुख्य स्रोत मानले जाते. पण तूर, मूग आणि चणा यांपैकी नेमकी कोणती डाळ तुमच्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे? चला जाणून घेऊया.

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

Sakal

मुगाची डाळ

पिवळी मूग डाळ आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर मानली जाते. आयुर्वेदात हिला 'क्वीन ऑफ पल्सेस' म्हटले जाते. ही डाळ पचायला अतिशय हलकी आणि पोषक तत्वांनी समृद्ध असते.

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

Sakal

मूग डाळीचे फायदे

वजन कमी करायचे असेल किंवा मधुमेहाचा त्रास असेल, तर मूग डाळ उत्तम आहे. ही डाळ पचनसंस्था सुधारते, शरीराला डिटॉक्स करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

Sakal

तुरीची डाळ : रोजच्या जेवणाची शान

तुरीची डाळ ही रोजच्या आहारासाठी सर्वोत्तम मानली जाते. भातासोबत वरण म्हणून खाण्यासाठी ही डाळ चविष्ट आणि पौष्टिक असते.

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

Sakal

तुरीच्या डाळीचे फायदे

तुरीची डाळ प्रथिने आणि फॉलिक ॲसिडचा उत्तम स्रोत आहे. ही डाळ शरीराला संतुलित ऊर्जा देते. गरोदर महिलांसाठी आणि मुलांच्या वाढीसाठी ही डाळ अत्यंत गुणकारी आहे.

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

Sakal

चण्याची डाळ : ताकदीचा खजिना

चणा डाळ ही प्रथिनांच्या बाबतीत सर्वात 'हेवी' मानली जाते. जर तुम्हाला स्नायू मजबूत करायचे असतील आणि ताकद वाढवायची असेल, तर चणा डाळीचा समावेश आहारात करा.

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

sakal

पचायला थोडी जड!

चण्याची डाळ पौष्टिक असली तरी ती पचायला थोडी जड असते. त्यामुळे ज्यांना गॅस किंवा अपचनाचा त्रास आहे, त्यांनी चणा डाळ मर्यादित प्रमाणात खावी. मात्र, रोगप्रतिकारक शक्तीसाठी ती उत्तम आहे.

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

sakal

कोणती डाळ निवडावी?

मूग डाळ सर्वात सुरक्षित आणि हलकी आहे. पचनशक्ती चांगली असल्यास तुरीची डाळ रोज घेऊ शकता. डाळ बनवताना त्यात हिंग आणि जिऱ्याची फोडणी दिल्यास पचन सुलभ होते!

Toor dal vs Moong dal vs Chana dal benefits

|

sakal

डायबिटीज असणाऱ्यांनी 'हे' पदार्थ खाऊच नये! तज्ज्ञांनी सांगितली लिस्ट

Foods to avoid in diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा