सकाळ डिजिटल टीम
शेवग्याच्या शेंगा, पाने, बिया आणि फुलं यांचा उपयोग आयुर्वेदामध्ये प्राचीन काळापासून होत आला आहे. यास 'सुपरफूड' म्हणून ओळखले जाते, कारण यामध्ये अनेक पौष्टिक घटक असतात.
शेवग्याला मोरिंगा (Moringa) असेही म्हणतात. आपल्या रोजच्या आहारात शेवग्याची भाजी सामावून घेतल्यास शरीर निरोगी राहते आणि अनेक आजार दूर राहतात.
शेवग्याच्या भाजीमध्ये खालील महत्त्वाचे पोषक घटक आढळतात :
लोह (Iron)
कॅल्शियम (Calcium)
व्हिटॅमिन C, A, E, B6
मॅग्नेशियम आणि पोटॅशियम
फायबर व प्रथिने
शेवग्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C मुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. संसर्गजन्य रोगांपासून शरीराचे संरक्षण होते.
कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक हाडे मजबूत करण्यास मदत करतात. मुलांच्या वाढीमध्येही हे उपयोगी आहे.
शेवग्यात फायबर भरपूर असल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन टाळण्यासाठी फायदेशीर आहे.
शेवग्याच्या पानांपासून तयार होणाऱ्या पावडरमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. व्यायाम करणाऱ्यांसाठी हे पाचक आणि नैसर्गिक प्रोटीन स्रोत ठरते.
शेवग्यातील गुणधर्म शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकून रक्तशुद्ध करतात आणि लिव्हरचे आरोग्य टिकवून ठेवतात.
शेवग्याच्या सेवनामुळे ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित राहते, जे डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार राहते आणि केसांची वाढ सुधारते. केस गळणे कमी होते.
महिलांमध्ये मेनोपॉज, थायरॉईड यासारख्या हार्मोनल समस्यांवर शेवग्याची भाजी फायदेशीर ठरते.
भाजी म्हणून शिजवून खा
सूप किंवा मोरिंगा पावडर स्वरूपात
शेवग्याच्या शेंगांचं लोणचं
भाजलेली बियं खाण्यासाठी उपयोगी