Moringa Side Effects : शेवगा 'या' 5 लोकांसाठी अत्यंत घातक, सेवन केल्यास होऊ शकतात गंभीर आजार

सकाळ डिजिटल टीम

शेवग्याचे फायदे आणि सावधगिरी

शरीर निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक असते. या निरोगी आहारामध्ये शेवगा (ड्रमस्टिक/मोरिंगा) देखील समाविष्ट आहे.

Moringa Side Effects

|

esakal

कोणत्या लोकांनी शेवगा खाऊ नये?

शेवग्यामध्ये भरपूर पोषक घटक असल्यामुळे तो आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. मात्र, काही लोकांनी चुकूनही तो खाऊ नये, कारण त्याचे दुष्परिणाम गंभीर ठरू शकतात.

Moringa Side Effects

| esakal

शेवग्यातील पोषक घटक

शेवग्यामध्ये व्हिटॅमिन A, C, E, K, B कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात. हे घटक शरीरासाठी फायदेशीर असले तरी काही परिस्थितीत ते हानिकारक ठरू शकतात.

Moringa Side Effects

| esakal

गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिला

गर्भवती महिलांनी किंवा स्तनपान करणाऱ्या मातांनी शेवग्याचे सेवन करू नये. यामुळे गर्भपाताचा धोका वाढू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय शेवगा खाणे टाळावे.

Moringa Side Effects

|

esakal

मधुमेही रुग्ण

मधुमेह असलेल्या रुग्णांनी शेवगा टाळावा. कारण, तो रक्तातील साखरेची पातळी असंतुलित करू शकतो. मधुमेहात साखर नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Moringa Side Effects

|

esakal

कमी रक्तदाब असलेले लोक

ज्यांचा रक्तदाब सतत कमी राहतो, त्यांनी शेवगा खाऊ नये. त्यामध्ये असलेले अल्कलॉइड्स रक्तदाब आणखी घटवू शकतात, जे धोकादायक ठरू शकते.

Moringa Side Effects

|

esakal

पचनसंस्था कमजोर असलेले लोक

ज्यांचे वारंवार पोट बिघडते किंवा पचनाच्या समस्या असतात, त्यांनी शेवगा मर्यादित प्रमाणात खावा. जास्त प्रमाणात सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याचा धोका असतो.

Moringa Side Effects

| esakal

यकृताच्या समस्या असलेले रुग्ण

ज्यांना यकृताशी संबंधित आजार आहेत, त्यांनी शेवगा टाळावा. यामुळे लिव्हरवरील ताण वाढून आजार गंभीर होऊ शकतो.

Moringa Side Effects

| esakal

सावधान! किडनी स्टोन, यकृत, पित्ताशय रुग्णांनी का टाळावी हळद? गरोदर महिलांसाठीही ठरू शकते घातक

Turmeric Side Effects

|

esakal

येथे क्लिक करा...