सकाळ डिजिटल टीम
आपण अनेकदा पाहिलं असेल की, सकाळी शौचाला जाण्याआधी अनेकजण पाणी पितात. मोठ्या माणसांकडूनही याचा सल्ला दिला जातो.
शौचाला जाण्यापूर्वी पाणी पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. चला, याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ..
जर तुम्ही शौचाला जाण्याआधी पाणी पित असाल, तर त्यामुळे पचनसंस्था सुधारते. शिवाय, मलविसर्जन सुलभ होते.
शौचापूर्वी पाणी प्यायल्याने अपचन व अॅसिडिटीसारख्या समस्या उद्भवत नाहीत.
सकाळी पाणी पिल्याने आतडी सक्रिय होतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) सुधारते.
शौचापूर्वी सकाळी तुम्ही कोमट पाणी प्यावं किंवा सामान्य तापमानातील पाणी प्यावं.