शरीराला 'जीवनसत्त्वांचे टॉनिक'! सकाळच्या वेळी ही फळे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Aarti Badade

फळे : पोषक घटकांचा साठा

फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, कारण त्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात.

Sakal

सकाळी फळे खाण्याचे फायदे

सकाळी उठून ताजी आणि सीझनल फळे खाल्ल्यास तुम्ही मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर राहू शकता.

Sakal

सकाळी खाण्यासाठी सर्वोत्तम फळे

सफरचंद, पपई, डाळिंब, मोसंबी आणि केळी यांसारखी सर्व प्रकारची फळे सकाळी उठल्यानंतर खाणे गरजेचे आहे.

Sakal

ॲसिडिटीचा त्रास असल्यास काय कराल?

ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी आंबट फळे सकाळी रिकाम्या पोटी खाणे टाळावे आणि ती नाश्त्यानंतर खावीत.

Sakal

मधुमेहींसाठी खास फळे

मधुमेह (Diabetes) असलेल्या रुग्णांनी केळी, चिकू, सीताफळ ही उच्च शर्करा असलेली फळे टाळावीत, त्याऐवजी संत्री, मोसंबी, पेरू खावेत.

Sakal

हृदयविकारासाठी 'हे' खा

हृदयविकार (Heart Disease) असलेल्यांनी डाळिंब, सफरचंद आणि किवी ही फळे सकाळी किंवा नाश्त्यानंतर १-२ तासांनी खावीत.

Sakal

ज्यूस नव्हे, फळे खा!

आरोग्यासाठी फळांचा ज्यूस पिण्यापेक्षा नुसती ताजी फळे खाणे कधीही जास्त फायदेशीर ठरते, असा आहार तज्ज्ञांचा सल्ला आहे.

Sakal

कॅल्शियमची कमतरता, हाडं ठिसूळ! ऑस्टियोपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी रोज खा 'हे' 1 सुपरफूड!

Bone Health & Calcium Sources

|

Sakal

येथे क्लिक करा