Monika Shinde
एक लक्ष केंद्रित दिवस सुरू होतो एका लक्ष केंद्रित सकाळी. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमची उत्पादकता, स्मरणशक्ती आणि प्रेरणा वाढवायची असेल, तर सकाळी ८ वाजण्यापूर्वी या ७ साध्या सवयी तुमचे आयुष्य बदलू शकतात.
दररोज एकाच वेळेला उठल्याने शरीराला सवय लागते. यामुळे लक्ष चांगलं लागते, मन प्रसन्न राहतं आणि उगाच आळस येत नाही.
रात्रभर झोपेत असताना शरीराला पाणी मिळत नाही. त्यामुळे उठल्यावर एक ग्लास पाणी प्यायल्याने मेंदू आणि शरीर दोन्ही ताजेतवाने होतात.
५–१० मिनिटे चालणं, हलकं स्ट्रेच करणं किंवा दोन्ही केल्याने शरीरात रक्ताची योग्य हालचाल होते. यामुळे डोकं फ्रेश वाटतं आणि अभ्यासात लक्ष लागतं.
दिवसात काय करायचं ते कागदावर थोडक्यात लिहा. २–३ महत्त्वाच्या गोष्टी ठरवा. यामुळे वेळ वाचतो आणि उगाच गोंधळ होत नाही.
सकाळी उपाशी पोटाने अभ्यास होत नाही. अंडी, दूध, फळं, पोळी-भाजी किंवा दाण्याचं काही खा. फार साखर असलेलं खाणं टाळा. यामुळे दिवसभर फ्रेश आणि लक्ष केंद्रीत राहता येतं.
उठल्याबरोबर मोबाईल स्क्रोल करू नका. त्याऐवजी थोडं वाचा, लिहा किंवा हलकी गाणी ऐका. सोशल मीडियामुळे लक्ष भरकटतं आणि वेळ वाया जातो.
डोळे बंद करून शांतपणे श्वास घ्या-छोडा. किंवा थोडं लिहा. यामुळे मन शांत राहतं आणि अभ्यास करताना लक्ष लागतं.