Monika Shinde
गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच डॉक्टरांकडे नियमित तपासणी करणे अत्यावश्यक आहे. आणि नियमित सोनोग्राफी आणि रक्ततपासण्या करावे.
फळे, भाज्या, दुधाचे पदार्थ, डाळी आणि प्रोटीनयुक्त आहार घ्या.
जास्त मसालेदार, तेलकट व शिळे अन्न टाळावे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फोलिक अॅसिड, आयर्न आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्या.
प्रसूतीपूर्व योगा, चालणे किंवा सौम्य स्ट्रेचिंगचा फायदा होतो. थकवा जाणवेल असे व्यायाम करू नका
दररोज किमान ८-१० तास झोप घेणे गर्भवतीसाठी फायदेशीर असते.
ध्यान, सकारात्मक विचार आणि कुटुंबाचा पाठिंबा महत्वाचा आहे.
धूम्रपान, मद्यपान, गुटखा आणि इतर व्यसने गर्भाला हानी पोहोचवू शकतात.
अत्यधिक रक्तस्राव, पोटात तीव्र वेदना, उलट्या थांबत नसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या