Pranali Kodre
इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर १९ जुलैला वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने २७ धावांनी विजय मिळवला.
Rohit Sharma - Virat Kohli
Sakal
पण असं असलं तरी या सामन्यात भारतासाठी सलामीवीर रोहित शर्माने ११० चेंडूत १३८ धावांची खेळी करत सर्वांचेच लक्ष वेधलं.
Rohit Sharma
Sakal
रोहितची ही खेळी विक्रमी देखील ठरली आहे. तो लॉर्ड्सवर वनडे शतक करणारा पहिला भारतीय ठरला आहे.
Rohit Sharma
Sakal
याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सचिन तेंडुलकरचा मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
Rohit Sharma
Sakal
रोहितने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४६ शतके केली आहेत.
Rohit Sharma
Sakal
सचिन तेंडुलकरने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके केली आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
या यादीत अव्वल क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने ४९ शतके केली आहेत.
David Warner
Sakal
MS Dhoni Spotted Using Miniature Radio Receiver
Sakal