संतोष कानडे
महाराष्ट्रात असे अनेक रस्ते आहेत, जिथे अपघातांचं प्रमाण जास्त आहे किंवा थरार तरी अनुभवायला मिळतो.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा घाटरस्ता पावसाळ्यामध्ये धोकेदायक आहे. एकतर धुक्यांमुळे काही दिसत नाही आणि दरडी कोसळण्याचं प्रमाण जास्त आहे.
ठाणे-अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सीमेवर असलेला हा घाट पावसाळ्यात मृत्यूचा सापळा ठरतो. हा घाट पर्यटकांना आवडत असला तरी धोकेदायक आहे.
भोर आणि महाडला जोडणारा हा घाट थरारक आहे. अरुंद रस्ता आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणं जीवघेणं आहे.
हा घाट मुंबई-गोवा महामार्गावर आहे. हा घाट म्हणजे नागमोडी वळणांचा रस्ता. अनेक अपघातांमुळे या घाटाशी अनेक गुढ कथा जोडल्या गेलेल्या आहेत.
पुण्याहून कोकणात जाण्यासाठी ताम्हिणी घाटाचा वापर केला जातो. पावसाळ्यामध्ये येथे प्रचंड धुकं असतं. येथे रस्ता खचण्याचा प्रकार बरेच घडतात.
तीव्र उतार आणि वेगवान वाहतूक, यामुळे या घाटामध्ये वाहनं चालवणं मोठं आव्हान असतं. खंडाळा आणि लोणावळ्याच्या दरम्यान असेला हा घाट आहे.
नाणेघाट परिसरातील अंतर्गत रस्ते अरुंद आणि कच्चे आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये रस्ते निसरडे होतात.