'या' मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते राम नवमी

Anushka Tapshalkar

राम नवमी

चैत्र नवरात्रांच्या शेवटच्या दिवशी, नवमी तिथीला राम नवमी साजरी केली जाते. या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला असल्यामुळे भक्त त्याचा जन्मोत्सव आणि पूजा करतात.

Ram Navami 2026

|

sakal

देशभरातील उत्सव

राम नवमीच्या दिवशी भारतभरातील प्रमुख श्रीराम मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, हवन आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतात.

Ram Navami Celebration

|

sakal

अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर

अयोध्येतील हे मंदिर श्रीरामाचा जन्मस्थळ मानले जाते. लाखो भक्त दरवर्षी येथे येऊन जन्मोत्सव साजरा करतात.

Ram Mandir, Ayodhya

|

sakal

संकट मोचन हनुमान मंदिर, वाराणसी

वाराणसीतील हे मंदिर हनुमानाला समर्पित आहे, पण राम भक्त विशेष करून येथे भजन-कीर्तन आणि पूजा करण्यासाठी येतात.

Sankat Mochan Hanuman Mandir, Varanasi

|

sakal

रामेश्वरम मंदिर, तमिळनाडू

रामेश्वरम मंदिर भगवान शिवाला समर्पित असून, श्रीरामाने लंकेला जाण्यापूर्वी येथे शिवपूजा केली होती, म्हणून ती एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.

Rameshwaram Temple, Tamilnadu

|

sakal

रामास्वामी मंदिर, तमिळनाडू

दक्षिण भारतातील प्रमुख मंदिर, जिथे श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची पूजा केली जाते. हे मंदिर “दक्षिण भारतातील अयोध्या” म्हणून ओळखले जाते.

Ramaswami Temple, Tamilnadu

|

sakal

सीता रामचंद्र स्वामी मंदिर, तेलंगणा

भद्राचलम येथील तेलंगणातील मंदिर श्रीराम आणि माता सीता यांना समर्पित आहे.

Sita Ramchandra Swami Temple, Telangana

|

sakal

त्रिप्रयार मंदिर, केरळ

केरळमधील त्रिप्रयार मंदिर भाविकांना मानसिक शांती देणारे प्रसिद्ध ठिकाण आहे.

Triprayar Temple, Kerala

|

sakal

महाराष्ट्रातील 'या' गावात आहे दुर्योधनाचे एकमेव मंदिर, दर्शनाला होते भाविकांची गर्दी

Duryodhana Temple Durgav

|

esakal

आणखी वाचा