Pranali Kodre
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात १९ ऑक्टोबर २०२५ रोजी पर्थ येथे पहिला वनडे सामना पार पडला.
India vs Australia
Sakal
हा सामना भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता.
Rohit Sharma
Sakal
त्यामुळे तो ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा जगातील ११ वा, तर भारताचा पाचवा खेळाडू ठरला.
Rohit Sharma
Sakal
भारताच्या राहुल द्रविडने ५०९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील ५०५ सामने त्याने भारतासाठी, तर ४ सामने आयसीसी आणि आशिया एकादश संघासाठी खेळले आहेत.
Rahul Dravid
Sakal
भारताच्या एमएस धोनीने ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यातील ५३५ सामने त्याने भारतासाठी आणि ३ सामने आशिया एकादश संघासाठी खेळले आहेत.
MS Dhoni
Sakal
विराट कोहलीने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत भारतासाठीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले असून त्याने ५५१ सामने खेळले आहेत.
Virat Kohli
Sakal
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याने ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून हे सर्व सामने भारतीय संघासाठी खेळले आहेत.
Sachin Tendulkar
Sakal
India vs Australia
Sakal