समोर गंगेचा शांत प्रवाह अन् ऋषिकेशमधील सर्वात शांत घाट

Pranali Kodre

ऋषिकेश

पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेलं भारतातील एक ठिकाण म्हणजे ऋषिकेश.

Shatrughana Ghat, Rishikesh

|

Sakal

अनेक प्रसिद्ध घाट

ऋषिकेशमध्ये अनेक प्रसिद्ध घाट आहेत. तिथे होणारी गंगा आरतीही प्रसिद्ध असून त्यासाठी लोक या घाटांना भेट देतात.

Shatrughana Ghat, Rishikesh

|

Sakal

शत्रुघ्न घाट

अनेक घाटांवर भाविकांची गर्दी असते, पण असाही एक घाट आहे जो गर्दीपासून दूर आहे. हा घाट म्हणजे 'शत्रुघ्न घाट'.

Shatrughana Ghat, Rishikesh

|

Sakal

शांत, निवांत आणि आध्यात्मिक अनुभूती

ऋषिकेशच्या गजबजलेल्या पर्यटनस्थळांपेक्षा शत्रुघ्न घाटावरील वातावरण तुलनेने शांत, निवांत आणि आध्यात्मिक अनुभूती देणारं आहे.

Shatrughana Ghat, Rishikesh

|

Sakal

नावामागील कहाणी

पौराणिक कथेनुसार भगवान श्रीराम यांचे धाकटे भाऊ शत्रुघ्न यांनी ऋषिकेशमधील मुनी की रेती परिसरात तपश्चर्या केली होती. याच मान्यतेमुळे येथील परिसराला शत्रुघ्न घाट अशी ओळख मिळाली.

Shatrughana Ghat, Rishikesh

|

Sakal

स्वतःसोबत घालवण्याची संधी

या घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे गंगेचा शांत प्रवाह, नदीकिनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक वातावरण. येथे काही वेळ स्वतःसोबत घालवण्याची संधीही मिळते.

Shatrughana Ghat, Rishikesh

|

Sakal

सुंदर दृश्य

इतकेच नाही, तर हा घाट राम झुला आणि जानकी सेतू परिसरादरम्यान असल्याने सुंदर दृश्य येथे पाहायला मिळते.

गंगा आरती

संध्याकाळी शत्रुघ्न घाटावर गंगा आरती होते. यावेळी जानकी सेतूवर होणारी विद्युत रोषणाई पाहाता येते.

Shatrughana Ghat, Rishikesh

|

Sakal

काळजी घ्या

दरम्यान पावसाळ्यात नदीची पाणीपातळी आणि प्रवाह वाढू शकतो, त्यामुळे पाण्यात उतरताना काळजी घ्यावी. याशिवाय घाटावर आणि नदीची स्वच्छता राखावी.

ऋषिकेशमधील गर्दीपासून दूर असलेलं 'सिक्रेट वॉटरफॉल'; मनसोक्त भिजताही येतं

Secret Waterfall Rishikesh

|

Sakal

येथे क्लिक करा