मुंबईतील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी लोकप्रिय ठिकाणे कोणती?

Mansi Khambe

दहीहंडी

महाराष्ट्रातील गोपाळकाला किंवा दहीहंडी हा सण सर्वात प्रतिष्ठित उत्सवांपैकी एक आहे. १६ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाणार असून यादिवशी राज्यभरात गोविंदा मोठ्या उत्साहात 'बोल बजरंग बली की जय' असं म्हणत दहीहंडी फोडतात.

Dahihandi | ESakal

मुंबईतील ठिकाणं

मुंबईत दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुम्हीही मुंबईत किंवा उपनगरीय शहरात असाल तर दहीहंडी पाहण्यासाठी या खास ठिकाणांना नक्कीच भेट द्या.

Dahihandi | ESakal

किंग्ज सर्कल (GSB मंडळ)

किंग्ज सर्कल येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (GSB) हे मुंबईतील सर्वात जुने आणि प्रसिद्ध दहीहंडी उत्सवांपैकी एक आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक दहीहंडी पाहण्यासाठी येतात.

Dahihandi | ESakal

दादर

दादर हे दहीहंडीसाठी एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे तुम्हाला गोविंदा पथकांची जोरदार स्पर्धा आणि प्रचंड गर्दी अनुभवायला मिळेल. अनेक वर्षांपासूनचे दहीहंडी उत्सव येथे साजरे केले जातात.

Dahihandi | ESakal

लालबाग

गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध असणारा लालबाग परिसर दहीहंडी उत्सवासाठी देखील खूप लोकप्रिय आहे. येथे बाल गोपाल मित्र मंडळातर्फे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. उंचीवर टांगलेलं दह्याचं मडकं फोडण्यासाठी गोविंदा पथक ताकद लावतो आणि ते पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी जमते.

Dahihandi | ESakal

घाटकोपर

घाटकोपरमध्ये, श्री कृष्ण जन्माष्टमी उत्सव मंडळ सर्वात भव्य आणि आव्हानात्मक दहीहंडी कार्यक्रमांपैकी एक आयोजित करते. ही हंडी एका महत्त्वपूर्ण उंचीवर ठेवली जाते, ज्यामुळे स्पर्धात्मक उत्साहात भर पडते.

Dahihandi | ESakal

विलेपार्ले आणि लोअर परेल

विलेपार्ले आणि लोअर परेल येथे अनेक ठिकाणी थरावर थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज असतात. तसेच आकर्षक बक्षीस रकमेसाठी आणि गोविंदा संघाच्या तीव्र स्पर्धेसाठी हे ठिकाण ओळखले जाते.

Dahihandi | ESakal

जांबोरी मैदान, वरळी

वरळी येथील जांबोरी मैदान हे मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी कार्यक्रमांपैकी एक आयोजित करण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या प्रमाणात बक्षिसे दिली जात असून शहरातील सर्वोत्तम गोविंदा पथके येथे स्पर्धा करण्यासाठी एकत्र येतात.

Dahihandi | ESakal

ठाणे

मुंबईच्या बाहेर ठाणे हे भव्य दहीहंडी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. येथील कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात बक्षिसे दिली जातात, ज्यामुळे काही सर्वोत्तम गोविंदा संघ येतात. तीव्र स्पर्धा आणि मोठी गर्दी यामुळे ठाण्यात दहीहंडीचा उत्साह पाहण्यासारखा असतो.

Dahihandi | ESakal

देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती, पण स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधानच का लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतात?

Flag Hosting | ESakal
येथे क्लिक करा