Mansi Khambe
१५ ऑगस्ट हा दिवस देशातील लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या दिवशी आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता.
आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती संघर्ष केला. यंदा भारत ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झेंडा फडकावला आहे. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले आहे.
पण १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती सर्वोच्च पदावर असताना केवळ पंतप्रधानच ध्वजारोहण का करतात? कारण देशाचा पहिला नागरिक तर राष्ट्रपती असतो. हा प्रश्न तुमच्या मनात आला आहे का?
खरंतर, १९४७ मध्ये आपल्या देशाचे संविधान तयार नव्हते आणि त्यावेळी भारतातील सर्वोच्च पद पंतप्रधानांचे होते. म्हणूनच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशात पहिल्यांदाच ध्वजारोहण केले.
१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर पोहोचू न शकल्यामुळे, १६ ऑगस्ट १९४७ रोजी पंडित नेहरूंनी लाल किल्ल्याच्या लाहोर गेटवरून ध्वजारोहण केले. तसेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.
तेव्हापासून, १५ ऑगस्ट रोजी देशाचे फक्त पंतप्रधानच ध्वजारोहण करत आहेत. २२ जुलै १९४७ रोजी संविधान सभेने तीन पट्टे आणि मध्यभागी अशोक चक्र असलेला भारतीय ध्वज स्वीकारला.
भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली वेंकय्या यांनी डिझाइन केला होता. ते आंध्र प्रदेशातील एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.
भारतातील पहिला भारतीय राष्ट्रीय ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकाता येथील पारसी बागान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे फडकवण्यात आला.