भारतातली आठ रोमँटिक ठिकाणं कोणती?

संतोष कानडे

रोमँटिक

तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला काही मौल्यवान क्षण घालवायचे असतील तर आपल्याच देशात काही रोमँटिक ठिकाणं आहेत. नक्की बघा आणि प्लॅन करा.

उदयपूर

तलावांची नगरी म्हणून राजस्थानमधल्या उदयपूरची ओळख आहे. निर्मळ आणि शांत तलाव, सिटी पॅलेस आणि पिचोलाचा सूर्यास्त बघणं अविस्मरणीय अनुभव.

गुलमर्ग

जम्मू काश्मीरमधलं गुलमर्ग हा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. बर्फाने अच्छादलेले डोंगर, सुंदर शांत दऱ्या आणि गोंडोला राईड.. या व्हॅलीमध्ये जोडप्यांना एकांत मिळतो.

हॅवलॉक

अंदमानातलं हॅवलॉक बेट आणि राधानगर बीचसारखे पांढऱ्या वाळूचे किनारे. वॉटर व्हिला, स्कूला ड्रायव्हिंग आपल्या पार्टनगरसोबत नक्की करा.

गोवा

गोवा म्हणजे काळजाचा विषय. सुंदर समुद्रकिनारे पोर्तुगीजांची वास्तूकला आणि नाईट लाईफचा आनंद. एकांतात वेळ घालवण्यासाठी साऊथ गोवा सर्वोत्तम आहे.

कंचनगंगा

चहाचे मळे आणि कंचनगंगा अनुभवण्यासाठी पश्चिम बंगालमधल्या दार्जिलिंगा नक्की जावं. येथे थंड हवा, टॉय ट्रेन आणि रोमँटिक सूर्योदय पाहाणं विसरु नका.

कॉफी

कॉफीची भूमी म्हणून ओळख असलेला कूर्ग. धुक्यामध्ये लुप्त झालेले डोंगर एक निराळीच नैसर्गिक अनुभूती देतो. याला भारताचं स्कॉटलंड म्हणतात.

मनाली

या यादीमध्ये मनाली नसेल तर मग काय उपयोग? हिमाचल प्रदेशातलं हे ठिकाण जोडप्यांसाठी सर्वोत्तम आहे. बियास नदीचा किनारा, माल रोडवरच वॉक, सुंदर दऱ्या आणि खूप काही.

विमानाचं तिकीट स्वस्तात मिळवण्याच्या ट्रिक्स

<strong>येथे क्लिक करा</strong>