Ranji Trophy 2023-24: सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज

सकाळ डिजिटल टीम

रणजी ट्रॉफी 2023-24

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई संघाने जिंकले.

Mumbai Cricket | PTI

मुंबईला विजेतेपद

मुंबईने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला आणि 42 व्यांदा रणजी ट्रॉफी उंचावली. यासह रणजी ट्रॉफीचा 89 वा हंगाम संपला.

Mumbai Cricket | PTI

सर्वाधिक धावा

दरम्यान या रणजीच्या 89 व्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांवर एक नजर टाकू.

Ricky Bhui | Instagram

1. रिकी भूई

आंध्रप्रदेशच्या रिकी भूईने या हंगामात 8 सामन्यात 75.16 च्या सरासरीने सर्वाधिक 902 धावा केल्या. यात 4 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.

Ricky Bhui | Instagram

2. सचिन बेबी

केरळच्या सचिन बेबीने या हंगामात 7 सामन्यांत 83 च्या सरासरीने 4 शतके आणि 4 अर्धशतकांसह 830 धावा केल्या.

Sachin Baby | Instagram

3. चेतेश्वर पुजारा

सौराष्ट्राचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने या रणजी हंगामात 8 सामने खेळताना 69.08 च्या सरासरीने 829 धावा केल्या, ज्यात 3 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

Cheteshwar Pujara | X/BCCIDomestic

4. एन जगदिशन

तमिळनाडूकडून एन जगदिशनही या हंगामात शानदार खेळला. त्याने 9 सामन्यांत 74.18 च्या सरासरीने 816 धावा केल्या. यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतकांचा समावेश. दरम्यान त्याने या हंगामात त्रिशतकही केले.

N Jagadeesan | Instagram

5. शाश्वत रावत

बडोद्याच्या शाश्वत रावतने या हंगामात 8 सामने खेळले, ज्यात त्याने 60.3 च्या सरासरीने 784 धावा केल्या. यामध्ये 4 शतकांचा आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

Shashwat Rawat | X/BCCIDomestic

Ranji Trophy Final: मुशीर खानने 'सामनावीर' जिंकत श्रेयस अय्यरला पछाडलं

Musheer Khan | PTI