Ranji Trophy Final: मुशीर खानने 'सामनावीर' जिंकत श्रेयस अय्यरला पछाडलं

सकाळ डिजिटल टीम

रणजी ट्रॉफी 2023-24

रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचे विजेतेपद अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने जिंकले.

Mumbai Cricket | PTI

मुंबईचा विजय

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव करत 42 व्यांदा रणजी ट्रॉफीवर नाव कोरले.

Mumbai Cricket | PTI

मोलाचा वाटा

अंतिम सामन्यात मुंबईला विजय मिळवून देण्यात 19 वर्षीय मुशीर खानने मोलाचा वाटा उचलला.

Musheer Khan | PTI

मुशीरची अंतिम सामन्यातील कामगिरी

सर्फराजचा धाकटा भाऊ असलेल्या मुशीरने अंतिम सामन्यात पहिल्या डावात 6 धावा, तर दुसऱ्या डावात 136 धावांची शतकी खेळी केली. तसेच गोलंदाजी करतानाही त्याने दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या.

Musheer Khan | PTI

सामनावीर

त्याच्या या कामगिरीमुळे त्याला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कारही देण्यात आला. त्यामुळे तो रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे.

Musheer Khan | PTI

श्रेयस अय्यरला टाकले मागे

14 मार्च 2024 रोजी जेव्हा मुंबईने रणजी ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले, तेव्हा मुशीरचे वय 19 वर्षे 16 दिवस होते. यापूर्वी सर्वात कमी वयात रणजीच्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरण्याचा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता.

Musheer Khan | PTI

श्रेयस अय्यर

श्रेयसने 2016 साली मुंबईकडून खेळताना सौराष्ट्र विरुद्ध रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी त्याचे वय 21 वर्षे 83 दिवस होते.

Shreyas Iyer | X/BCCIDomestic

केएल राहुल

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुल आहे. त्याने 2014 साली कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र संघात झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता. त्यावेळी त्याचे वय 21 वर्षे 291 दिवस होते.

KL Rahul | X

IPL 2024 आधी कॅप्टनकूलच्या 'विंटेज लूक'ची चर्चा

MS Dhoni | X/ChennaiIPL