Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सला १२ धावांनी पराभवाचा धक्का दिला.
पण, याच सामन्यात मुंबईचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह मात्र सर्वात महागडा गोलंदाज ठरला.
बुमराहने ४ षटकात ४४ धावा देत १ विकेट घेतली. त्याच्याविरुद्ध सर्वाधिक धावा करुण नायरने ठोकल्या.
करुण नायरने बुमराहच्या ९ चेंडूंचा सामना करताना २६ धावा फटकावल्या, यातील १८ धावा त्याने एकाच षटकात ठोकल्या होत्या.
बुमराहविरुद्ध एकाच आयपीएल सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये आता करुण नायर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या क्रमांकावर शिखर धवन आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादकडून २०१६ मध्ये खेळताना बुमराहविरुद्ध १६ चेंडूत २७ धावा केल्या होत्या.
शिखर आणि करुणनंतर राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना २०२१ मध्ये बुमराहविरुद्ध ११ चेंडूत २५ धावा केल्या होत्या.
वृद्धिमान सहा देखील तिसऱ्या क्रमांकावर असून २०२२ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने बुमराहविरुद्ध ९ चेंडूत २५ धावा ठोकल्या होत्या.
विराट कोहली या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना बुमराहविरुद्ध १२ चेंडूत २३ धावा ठोकल्या होत्या.