Pranali Kodre
चेन्नई सुपर किंग्सने १४ एप्रिलला आयपीएल २०२५ स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५ विकेट्स विजय मिळवला.
या सामन्यातून चेन्नईकडून २० वर्षांच्या शेख रशीदने आयपीएलमध्ये पदार्पण केले.
त्याने चेन्नईकडून रचिन रवींद्रसोबत सलामीला फलंदाजीही केली. त्याने १९ चेंडूत २७ धावा देखील केल्या.
त्यामुळे शेख रशीदच्या नावावर खास विक्रमही झाला आहे.
शेख रशीद हा चेन्नई सुपर किंग्सचा सर्वात युवा सलामीवीर ठरला आहे. त्याने २० वर्षे २०२ दिवस वय असताना पहिल्यांदा चेन्नईसाठी सलामीला फलंदाजी केली.
याआधी हा विक्रम अष्टपैलू सॅम करन याच्या नावावर होता.
सॅम करन याने चेन्नईसाठी आयपीएलमध्ये २०२० मध्ये २२ वर्षे १३२ दिवस वय असताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिल्यांदा सलामीला फलंदाजी केली होती.