Pranali Kodre
संयुक्त अरब अमिराती येथे आशिया कप २०२५ स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. आशिया कप २०२५ स्पर्धा टी२० प्रकारात खेळवली जाणार आहे.
१९८४ साली सुरू आशिया कपमध्ये पूर्वी केवळ वनडे सामने होत होते. पण गेल्या काही वर्षांपासून आगामी आयसीसी स्पर्धांच्या दृष्टीने कधी वनडे, तर कधी टी२० स्वरुपात ही स्पर्धा होते.
आशिया कपमध्ये (वनडे आणि टी२० मिळून) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये भारत आणि श्रीलंकेच्या खेळाडूंचे वर्चस्व राहिले आहे. या यादीतील टॉप - ५ फलंदाजांबद्दल जाणून घ्या.
सचिन तेंडुलकरने आशिया कप स्पर्धेत २३ सामने खेळताना ५१.१० सरासरीने २ शतके आणि ७ अर्धशतकांसह ९७१ धावा केल्या आहेत.
कुमार संगकाराने आशिया कपमध्ये २३ सामने खेळताना ४८.८६ च्या सरासरीने ४ शतके आणि ८ अर्धशतकांसह १०७५ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने आशिया कप स्पर्धेत २६ सामने खेळले असून ६८.८८ च्या सरासरीने ५ शतके आणि ४ अर्धशतकांसह ११७१ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने आशिया कप स्पर्धेत ३७ सामने खेळले असून ४१.७२ च्या सरासरीने १ शतक आणि ११ अर्धशतकांसह १२१० धावा केल्या आहेत.
सनथ जयसूर्याने आशिया कप स्पर्धेत २५ सामन्यांत ५३.०४ च्या सरासरीने ६ शतके आणि ३ अर्धशतकांसह १२२० धावा केल्या आहेत.