Pranali Kodre
चेतेश्वर पुजाराने २४ ऑगस्ट रोजी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
भारताचा दिग्गज कसोटीपटू राहिलेल्या पुजाराच्या निवृत्तीनंतर अनेक आजी-माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली.
मात्र पुजाराचा अनेक वर्षे संघसहकारी राहिलेल्या विराट कोहलीची प्रतिक्रिया दोन दिवस आली नसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
पण अखेर दोन दिवसांनंतर पुजाराच्या निवृत्तीबाबत विराटने भाष्य केले आहे.
विराटने इंस्टाग्राम स्टोरीवर पुजारासोबतचा फोटो पोस्ट केला आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की 'माझ्यासाठी चौथ्या क्रमांकावरील काम सोपं करण्यासाठी आभार पुज्जी. तुझी कारकिर्द शानदार होती. तुझे अभिनंदन आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा.'
कसोटीमध्ये अनेक वर्षे भारतीय संघासाठी पुजाराने तिसऱ्या क्रमांकाची आणि विराट कोहलीने चौथ्या क्रमांकाची जबाबदारी सांभाळली होती, त्यामुळे अनेक अविस्मरणीय भागीदाऱ्याही या दोघांनी केल्या.