Pranali Kodre
साल २०२४ आता संपले आहे. त्यामुळे या वर्षातील सर्व क्रिकेट सामनेही संपले आहेत.
यामुळे आता २०२४ वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू निश्चित झाले आहेत.
भारताकडून २०२४ वर्षात सर्वाधिक धावा यशस्वी जैस्वालने केल्या आहेत. त्याने २३ सामन्यांतील ३७ डावात ३ शतके आणि ११ अर्धशतकांसह १७७१ धावा केल्या आहेत. त्याने यातील १४०० हून अधिक धावा कसोटीतच केले आहेत.
जैस्वालच्या पाठोपाठ भारताकडून २०२४ मध्ये सर्वाधिक धावा शुभमन गिलने केल्या आहेत. त्याने २३ सामन्यांतील ३३ डावात ३ शतके आणि ५ अर्धशतकांसह ११८९ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने २०२४ वर्षात भारतासाठी २८ सामन्यांतील ४० डावात ३ शतके आणि ७ अर्धशतकांसह ११५४ धावा केल्या आहेत. तो या वर्षात सर्वाधिक धावा करणारा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
भारताकडून २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत असून त्याने २० सामन्यांतील २८ डावात ८०४ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहली भारताकडून २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने २३ सामन्यांतील ३२ डावात ६५५ धावा केल्या आहेत, ज्यात १ शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहेत.
रविंद्र जडेजा आणि केएल राहुल यांनीही २०२४ वर्षात ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. जडेजाने ५६२ धावा, तर केएल राहुलने ५२४ धावा केल्या आहेत.