Pranali Kodre
साल २०२४ आता संपलं असून नव्या वर्षाचे स्वागत झाले आहे. अशात सारा तेंडुलकरने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
साराने या पोस्टमधून २०२४ वर्षात शिकलेल्या १२ गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टी ती नव्या वर्षातही घेऊन जाणार आहे.
चुका करण्याचे आणि अपयशी होण्यासाठी स्वत:ला स्वातंत्र्य द्या.
तुमच्या आत्म्याला ज्यामुळे ऊर्जा मिळेल, अशा लोकांसोबत आणि गोष्टीमध्ये अधिक वेळ घालवा.
तुम्हाला जे स्वत:बद्दल वाटते तेच बाहेर प्रतिबिंबत होतं.
जेव्हा गरज असेल, तेव्हा मदत मागण्यात काहीच चुकीचे नाही.
तुमचं प्रोफेशनल फक्त एकच असू शकत नाही, तुम्ही एकाच आयुष्यात अनेक गोष्टी करू शकता.
तुम्ही दिलेल्या नकाराचा कोणतीही सबब सांगून पाठपुरावा करू नका.
तुमच्या शरीराची काळजी घ्या, तुमचे शरीर तुमची काळजी घेईल.
योग्य आहार हा निर्बंध नाही तर आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषणाबद्दल आहे.
जर तुम्ही एकाद्याबद्दल चांगला विचार करत असाल, तर सांगून टाका.
एखाद्या गोष्टीबद्दल तुमचे मत बदलणे वाईट नाही.
एखाद्या गोष्टीची कल्पना करणे (manifestation) खरंच काम करते.
तुमचा विकास कंफर्ट झोन बाहेर जाऊन होतो, विकास करायचा असेल, तर तुम्हाला अनकंफर्टेबल व्हावं लागेल.