T20I क्रिकेटमध्ये २०२५ वर्षात सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ भारतीय

Pranali Kodre

भारताने २०२५ मध्ये खेळले २१ टी२० सामने

भारताचे २०२५ मधील टी२० क्रिकेटमधील सर्व २१ सामने संपले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका या वर्षातील अखेरची मालिका होती.

Most T20I Runs For India in 2025

|

Sakal

भारतासाठी सर्वाधिक टी२० धावा

त्यामुळे २०२५ या वर्षात आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंवर शिक्कामोर्तब झाले आहे. यातील पहिल्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Most T20I Runs For India in 2025

|

Sakal

५. संजू सॅमसन

यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने २०२५ मध्ये १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये ११ डावात फलंदाजी करताना एका अर्धशतकासह २२२ धावा केल्या.

Sanju Samson

|

Sakal

४. शुभमन गिल

शुभमन गिलने २०२५ मध्ये १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १५ डावात २९१ धावा केल्या. यात एकही अर्धशतक किंवा शतक नाही.

Shubman Gill

|

Sakal

३. हार्दिक पांड्या

अष्टपैलू हार्दिक पांड्याने २०२५ मध्ये १५ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १३ डावात फलंदाजी करताना ३ अर्धशतकांसह ३०२ धावा केल्या.

Hardik Pandya

|

Sakal

२. तिलक वर्मा

तिलक वर्माने २०२५ मध्ये २० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये १८ डावात खेळताना ४ अर्धशतकांसह ५६७ धावा केल्या.

Tilak Varma

|

Sakal

१. अभिषेक शर्मा

२०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा अभिषेक शर्माने केल्या. त्याने २१ सामन्यांत १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ८५९ धावा केल्या.

Abhishek Sharma

|

Sakal

कसोटीत २०२५ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-५ गोलंदाजांमध्ये 'हा' एकमेव भारतीय

Most Test Wickets in 2025

|

Sakal

येथे क्लिक करा