Pranali Kodre
सचिन तेंडुलकर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने २०० सामन्यात १५९२१ दावा केल्या आहेत.
जो रुटने नुकतेच १५७ व्या कसोटी सामन्यात खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे.
त्यामुळे सचिनच्या या सर्वाधिक कसोटी धावांच्या विक्रमाच्या जवळ जो रुटही आला असून आता त्याची नजर या विक्रमावर आहे.
दरम्यान, सचिन आणि जो रुट यांची त्यांच्या कारकिर्दीत पहिल्या १५७ कसोटी सामन्यातील कामगिरी कशी होती, हे पाहू.
जो रुटने १५७ कसोटी सामन्यातील २८६ डावात ५१.१७ सरासरीने १३४०९ धावा केल्या. यात ३८ शतके आणि ६६ अर्धशतके केली आहेत. २६२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली.
जो रुटने १५७ कसोटी सामन्यांमध्ये ७३ विकेट्सही घेतल्या आहेत.
सचिन तेंडुलकरने १५७ कसोटी सामन्यांमध्ये २५७ डावात ५४.७३ च्या सरासरीने १२५८९ धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या ४२ शतकांचा आणि ५१ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची २४८ ही सर्वोत्तम खेळी राहिली.
सचिनने १५७ कसोटी सामन्यांत ४२ विकेट्स घेतल्या होत्या.
जो रुटने वयाच्या ३४ व्या वर्षी मँचेस्टरमध्ये भारताविरुद्ध १५७ वा कसोटी सामना खेळताना १५० धावांची खेळी केली.
सचिन तेंडुलकरने हेमिल्टनला न्यूझीलंडविरुद्ध २००९ मध्ये वयाच्या ३६ व्या वर्षी १५७ वा कसोटी सामना खेळला होता. त्याने १६० धावांची खेळी केली होती. सचिन या सामन्यानंतर आणखी ४३ कसोटी सामने त्याच्या कारकिर्दीत खेळला.