भारत - इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे टॉप-५ फलंदाज

Pranali Kodre

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५

भारत आणि इंग्लंड संघात झालेली अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ ही पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत संपली.

Most Runs in England vs India Test Series 2025 | Sakal

९ फलंदाजांच्या ४००+ धावा

अतिशय रोमहर्षक झालेल्या या कसोटी मालिकेत तब्बल ९ फलंदाजांनी ४०० धावांचा टप्पा ओलांडला, जो एक विक्रम ठरला.

Harry Brook - Joe Root | Sakal

सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ फलंदाजांबद्दल आपण जाणून घेऊ.

KL Rahul Shubman Gill | Sakal

५. हॅरी ब्रुक - ४८१ धावा

पाचव्या क्रमांकावर हॅरी ब्रुक असून त्याने ९ डावात ५३.४४ च्या सरासरीने २ शतके आणि २ अर्धशतकांसह ४८१ धावा केल्या.

Harry Brook | Sakal

४. रवींद्र जडेजा - ५१६ धावा

चौथ्या क्रमांकावर रवींद्र जडेजा असून त्याने १० डावात १ शतक आणि ५ अर्धशतकांसह ८६ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या.

Ravindra Jadeja | Sakal

३. केएल राहुल -५३२

केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने १० डावात ५३.२० च्या सरासरीने २ शतके आणि २ अर्धशतकांसह ५३२ धावा केल्या.

KL Rahul | Sakal

२. जो रुट - ५३७ धावा

जो रुट दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने ९ डावात ६७.१२ च्या सरासरीने ३ शतके आणि १ अर्धशतकासह ५३७ धावा केल्या.

Joe Root | Sakal

१. शुभमन गिल - ७५४ धावा

पहिल्या क्रमांकावर शुभमन गिल असून त्याने १० डावात ७५.४० च्या सरासरीने ४ शतकांसह ७५४ धावा ठोकल्या

Shubman Gill | Sakal

भारत - इंग्लंड कसोटी मालिका 'या' ५ विश्वविक्रमांमुळे ठरली ऐतिहासिक

England vs India Test Series Records
येथे क्लिक करा