Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाला ५ जानेवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटीत ६ विकेट्सने पराभवाचा स्वीकारावा लागला.
या पराभवामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही ५ सामन्यांची कसोटी मालिका देखील ३-१ अशा फरकाने गमावली.
दरम्यान, बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ खेळाडूंवर नजर टाकू.
भारताचा फलंदाज केएल राहुल या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पाचव्या क्रमांकाचा खेळाडू आहे. त्याने १० डावात २ अर्धशतकांसह २७६ धावा केल्या.
नितीश कुमार रेड्डी या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू असून त्याने ९ डावात २९८ धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असून त्याने ९ डावात ३१४ धावा केल्या. यात त्याने २ शतकांचा समावेश आहे.
भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांचा खेळाडू असून १० डावात ३९१ धावा केल्या. त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके केली.
या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने केल्या. त्याने ९ डावात ४४८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक केले आहे.