Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होणार आहे.
आयपीएलमध्ये या दोन संघात आत्तापर्यंत (२४ एप्रिल २०२५ पर्यंत) झालेल्या सामन्यांमध्ये कोणी सर्वाधिक धावा केल्या आहेत, हे जाणून घेऊ.
या यादीत पाचव्या क्रमांकावर शेन वॉटसन असून त्याने ८ सामन्यात १४८.३१ च्या स्ट्राईक रेटने ३५३ धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
चौथ्या क्रमांकावर एमएस धोनी असून त्याने २० सामन्यांत ३ अर्धशतकांसह १४०.६१ च्या स्ट्राईक रेटने ३६७ धावा केल्या आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड असून त्याने १५३.३० च्या स्ट्राईक रेटने ७ सामन्यांत ३ अर्धशतकांसह ३९४ धावा केल्या आहेत.
दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर असून त्याने ९ सामन्यात १४२.६० च्या स्ट्राईक रेटने ६ अर्धशतकांसह ४०५ धावा केल्या आहेत.
पहिल्या क्रमांकावर केन विलियम्सन असून त्याने १२ सामन्यांत १३२.८० च्या स्ट्राईक रेटने ३ अर्धशतकांसह ४१७ धावा केल्या आहेत.
आता या पाचमधील सध्या आयपीएल २०२५ मध्ये एमएस धोनी खेळतोय. ऋतुराज दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. अशात या यादीत धोनीला पहिल्या क्रमांकावर यायचे असेल तर अर्धशतक झळकवावं लागेल.
ही आकडेवारी २४ एप्रिल २०२५ पर्यंतची आहे.