एका IPL हंगामात कोणत्या अनकॅप्ट खेळाडूनं सर्वाधिक धावा केल्यात?

अनिरुद्ध संकपाळ

आयपीएल ही एक व्यावसायिक लीग असून याची आर्थिक गणितं खूप मोठी आहे. संघ मालकांचा, विदेशी खेळाडूंचा मोठा फायदा होते.

याचबरोबर आयपीएलमुळं देशातील युवा खेळाडूंना देखील मोठा फायदा झाल्याचं आपण पाहिलं आहे. युवा खेळाडूंना व्यासपीठ मिळतं. अनेक अनकॅप्ट खेळाडू हे आयपीएलमध्ये चमकले आहेत.

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या अनकॅप्ट खेळाडूंमध्ये पाचव्या स्थानावर सूर्यकुमार यादवंच नाव आहे. त्याने 2018 च्या हंगामात 512 धावा केल्या होत्या.

त्यानंतर चौथ्या स्थानावर इशान किशनचं नाव असून त्यानं 2020 च्या हंगामात 516 धावा केल्या होत्या.

2024 च्या हंगामात रियान परागनं आतापर्यंत 531 धावा केल्या आहेत. तो सध्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या अनकॅप्ट खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आहे. त्याने 2008 च्या हंगामात 616 धावा केल्या होत्या.

या यादीत अव्वल स्थान हे राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालनं पटकावलं आहे. त्याने 2023 च्या हंगामात 625 धावा चोपल्या होत्या.

रियान परागने रचला इतिहास, रोहित-पंतनंतर केली मोठी कामगिरी