रियान परागने रचला इतिहास, रोहित-पंतनंतर केली मोठी कामगिरी

Kiran Mahanavar

आयपीएल 2024

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्सची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे.

राजस्थान रॉयल्स

राजस्थान रॉयल्सने पहिल्या 9 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला होता, मात्र त्यानंतर सलग 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

संजू सॅमसन

मात्र, या हंगामात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनशिवाय अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. या यादीत पहिले नाव आहे युवा फलंदाज रियान परागचे.

13 सामन्यात 531 धावा

या हंगामात आतापर्यंत रियान परागने 13 सामन्यात 59 च्या सरासरीने 531 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक धावा

सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रियान पराग चौथ्या क्रमांकावर आहे.

500 पेक्षा जास्त धावा

रियान पराग हा आयपीएलच्या इतिहासातील फक्त तिसरा फलंदाज आहे. ज्याने चौथ्या क्रमांकावर किंवा खाली फलंदाजी करताना 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रियान पराग

यापूर्वी केवळ रोहित शर्मा आणि ऋषभ पंत हेच फलंदाज अशी कामगिरी करू शकत होते, मात्र आता रियान परागने आपले नाव नोंदवले आहे.

थेट कोचच्या मुलीच्या प्रेमात पडला सुनील छेत्री अन्...