Pranali Kodre
भारताचा टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या ३५ व्या वाढदिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध आशिया कपमध्ये नाबाद ४७ धावांची खेळी केली होती.
Suryakumar Yadav
Sakal
त्यामुळे आता टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमारने सुरेश रैनाचा विक्रम मोडला असून तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आला आहे.
Suryakumar Yadav
Sakal
१४ सप्टेंबर २०२५ पर्यंत सूर्यकुमारच्या टी२० क्रिकेटमध्ये ३२७ सामन्यांमध्ये ६ शतके आणि ५९ अर्धशतकांसह ८६७४ धावा झाल्या आहेत.
Suryakumar Yadav
Sakal
रैना पाचव्या क्रमांकावर घसरला असून त्याने ३३६ टी२० सामन्यांमध्ये ४ शतके आणि ५३ अर्धशतकांसह ८६५४ धावा केल्या आहेत.
Suresh Raina
Sakal
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर शिखर धवन असून त्याने ३३४ टी२० सामन्यांमध्ये २ शतके आणि ७० अर्धशतकांसह ९७९७ धावा केल्या आहेत.
Shikhar Dhawan
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माने ४६३ टी२० सामन्यांमध्ये ८ शतके आणि ८२ अर्धशतकांसह १२२४८ धावा केल्या आहेत.
Rohit Sharma
Sakal
अव्वल क्रमांकावर विराट कोहली असून त्याने त्याने ४१४ टी२० सामन्यांमध्ये ९ शतके आणि १०५ अर्धशतकांसह १३५४३ धावा केल्या आहेत.
Virat Kohli
Sakal
BCCI-Apollo Tyres Deal
Sakal