Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेत २८ एप्रिल रोजी जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध ८ विकेट्सने सहज विजय देखील मिळवला.
असे असले तरी या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने ५० चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली.
आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना गिलने १०० षटकांचा टप्पा पार केला. त्याचे आता ९१ सामन्यांत १०१ षटकार झाले आहेत. असा कारनामा करणारा सहावा भारतीय सलामीवीर ठरला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप-५ सलामीवीरांबाबत जाणून घ्या. (आकडेवारी: २८ एप्रिलपर्यंत २०२५)
१०४ षटकार - विरेंद्र सेहवाग (९८ सामने)
१३५ षटकार - रोहित शर्मा (१११ सामने)
१४३ षटकार - शिखर धवन (२०२ सामने)
१७१ षटकार - विराट कोहली (१२३ सामने)
१७४ षटकार - केएल राहुल (१०० सामने)