Pranali Kodre
आयपीएल २०२५ मध्ये २८ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सविरुद्ध ८ विकेट्सने विजय मिळवला.
या विजयात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने शतक करत मोलाचा वाटा उचलला. त्याने ३५ चेंडूत शतक केले.
वैभवने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली.
वैभवने हे शतक केले तेव्हा त्याचे वय १४ वर्षे ३२ दिवस होते. त्यामुळे तो सर्वात लहान वयात टी२० मध्ये शतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे.
यापूर्वी हा विक्रम महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नावावर होता. त्याने १८ वर्षे ११८ दिवस वय असताना २०१३ साली मुंबईविरुद्ध टी२० सामन्यात शतक केले होते.
सर्वात लहान वयात टी२० मध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर परवेझ होसेन आहे. त्याने १८ वर्षे १७९ दिवस वय असताना बारिशलसाठी राजशाहीविरुद्ध २०२० मध्ये टी२० सामन्यांत शतक केले होते.
या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर गुस्ताव मॅककिऑन फ्रान्ससाठी २०२२ मध्ये स्वित्झर्लंडविरुद्ध १८ वर्षे २८० दिवस वय असताना शतक केले होते.