Pranali Kodre
आयपीएल २०२६ स्पर्धेत २१ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सला ४७ धावांनी पराभूत केले.
Abhishek Sharma - Travis Head
Sakal
या सामन्यात हैदराबादसाठी अभिषेक शर्माने ६८ चेंडूत १३५ धावांची नाबाद खेळी केली, यात त्याने १० चौकार आणि १० षटकार मारले.
Abhishek Sharma
Sakal
त्यामुळे त्याने टी२० कारकिर्दीत ३५० षटकार पूर्ण केले. तो हा पराक्रम करणारा ६ वा भारतीय, तर एकूण जगातील ४४ वा खेळाडू ठरला.
Abhishek Sharma
Sakal
टी२० कारकिर्दीत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत अभिषेकने आता एमएस धोनीला मागे टाकले आहे.
Abhishek Sharma
Sakal
अभिषेकचे आता टी२० कारकिर्दीत १८८ सामन्यांत ३५१ षटकार झाले आहेत. त्यामुळे तो आता धोनीला मागे टाकत ५ व्या क्रमांकावर आलाय.
Abhishek Sharma
Sakal
एमएस धोनीचे ४०५ टी२० सामन्यांतील ३५५ डावात ३५० षटकार आहेत. धोनी टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीयांच्या यादीत ६ व्या क्रमांकावर आहे.
MS Dhoni
Sakal
या यादीत चौथ्या क्रमांकावर संजू सॅमसन असून त्याने ३३६ टी२० सामन्यांतील ३१९ डावात ४०५ षटकार मारले आहेत.
Sanju Samson
Sakal
सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर असून ३६६ टी२० सामन्यांतील ३४० डावात ४२३ षटकार मारले आहेत.
Suryakumar Yadav
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली असून ४२० टी२० सामन्यांतील ४०३ डावात ४४३ षटकार मारले आहेत.
Virat Kohli
Sakal
अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने ४६७ टी२० सामन्यांतील ४५४ डावात ५५५ षटकार मारले आहेत.
Rohit Sharma
Sakal
Tilak Varma
Sakal