Pranali Kodre
१ सप्टेंबर २०२५ रोजी युएई संघाला अफगाणिस्तानविरुद्ध टी२० सामन्यांत ३८ धावांनी पराभूत स्वीकारावा लागला. पण तरी युएईच्या कर्णधार मुहम्मद वासिमने ४ चौकार आणि ६ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली.
त्यामुळे वासिम आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार ठरला आहे. त्याचे आता ५४ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून ११० षटकार झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये वासिमने रोहित शर्माला मागे टाकले आहे.
रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६२ टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व करताना १०५ षटकार मारले आहेत.
तिसऱ्या क्रमांकावर ओएन मॉर्गन आहे. त्याने ७२ टी२० सामन्यात कर्णधार म्हणून खेळताना ८६ षटकार मारले आहेत.
चौथ्या क्रमांकावर ऍरॉन फिंच असून त्याने ७६ टी२० सामन्यात नेतृत्व करताना ८२ षटकार मारले आहेत.
पाचव्या क्रमांकावर के काडोवकी-फ्लेमिंग आहे. त्याने ३९ टी२० सामन्यांत नेतृत्व करताना ७९ षटकार मारले आहेत.