Pranali Kodre
भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ २७ ऑगस्ट रोजी आयपीएलमधूनही निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे तो आता बीसीसीआयच्या अंतर्गत स्पर्धेत खेळणार नाही.
अश्विनने ही निवृत्ती जाहीर करतानाच जगभरातील इतर स्पर्धांचा अनुभव घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता तो भारताबाहेर टी२० लीग खेळताना दिसू शकतो.
अश्विनने युएईच्या इंटरनॅशनल लीग टी२० (ILT20) स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार अश्विन स्पर्धेच्या आयोजकांशी चर्चा करत आहे. तो दुबईत ३० सप्टेंबरला होणाऱ्या या स्पर्धेच्या लिलावसाठी नोंदणी करण्याची दाट शक्यता आहे.
ILT20 स्पर्धेचा चौथा हंगाम २ डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे.
जर अश्विन या स्पर्धेत सहभागी झाला, तर ही स्पर्धा खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये त्याचे नाव नोंदले जाईल. यापूर्वी रॉबिन उथप्पा, युसूफ पठाण आणि अंबाती रायुडू हे भारतीय खेळाडू या स्पर्धेत खेळले आहेत.
अश्विन १६ वर्षे आयपीएल खेळला असून त्याने २२१ सामन्यांत १८७ विकेट्स घेतल्या आहेत, तर १ अर्धशतकासह ८३३ धावा केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.