Shubham Banubakode
आजपर्यंत इंडियन प्रीमियर लीगचे १७ हंगाम पूर्ण झाले असून १८ वा हंगामाला सुरुवात झाली आहे.
या १७ वर्षांच्या इतिहात आजवर विक्रम नोंदवण्यात आले आहेत.
मात्र, आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज कोण? तुम्हाला माहिती का?
युजवेंद्र चहल हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.
चहलने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६० सामने खेळले असून २०५ गडी बाद केले आहेत.
गेल्या हंगामात चहल राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. त्यावेळी त्याने १८ बळी घेतले होते. यंदा चहल पंजाब किंग्जकडून खेळतो आहे.
चहलला पहिल्या सामन्यात म्हणावी तशी कामगिरी करता आली नाहीये.
मात्र, तो लवकरच फॉर्ममध्ये येईल, अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे.
पंजाब किंग्जने लिलावात चहलला १८ कोटी रुपये खर्चून आपल्या संघात सामील करून घेतले आहे.
चहलने आपल्या फिरकी गोलंदाजीने अनेकदा फलंदाजांना अडचणीत आणलं आहे.