शुभमन गिलची भारतीय सैन्यासाठी खास पोस्ट; ते सीमेवर उभे आहेत म्हणून...

Pranali Kodre

युद्धजनक परिस्थिती

भारत आणि पाकिस्तान या दोन देशात काही दिवसांपूर्वी युद्धजनक परिस्थिती निर्माण झाली होती.

Pahalgam Attack | Sakal

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय सैन्याकडून 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत देण्यात आले होते.

Indian Armed Forces | Sakal

आयपीएल २०२५ स्थगित

त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावाच्या काळात आयपीएल २०२५ स्पर्धाही ९ मे रोजी स्थगित करण्यात आली होती.

Shubman Gill | Sakal

८ दिवसांनी पुन्हा सुरुवात

पण, दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आयपीएल २०२५ स्पर्धेला पुन्हा ८ दिवसांनी १७ मे रोजी सुरुवात झाली.

Shubman Gill | Sakal

आदर

पुन्हा आयपीएलला सुरुवात झाल्यानंतर भारतीय सैन्याप्रती आदर मैदानात राष्ट्रगीत वाजवून व्यक्तही करण्यात आला.

IPL Thanks Indian Armed Forces | Sakal

पोस्टर

दरम्यान, १८ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघातील सामन्यादरम्यान भारतीय सैन्याच्याप्रती आदर व्यक्त करणारं 'जय हिंद' लिहिलेलं पोस्टरही स्टेडियममध्ये झळकलं.

Shubman Gill Thanks Indian Armed Forces | Sakal

शुभमन गिलची पोस्ट

याचा फोटो गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्याने त्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने अनेकांची मनं जिंकली.

Shubman Gill | Sakal

कॅप्शन

गिलने कॅप्शनमध्ये लिहिले, 'क्रिकेट जरी परतलं असलं, तरी खरे योद्ध्यांनी त्यांची पोस्ट सोडलेली नाही. आपल्या सैन्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, जय हिंद.'

Shubman Gill Thanks Indian Armed Forces | Sakal

श्रेयस अय्यरने IPL मध्ये याआधी कोणत्याच कर्णधाराला जे जमलं नव्हतं, ते करून दाखवलं

Shreyas Iyer | Sakal
येथे क्लिक करा