हा देश करतो झुरळांचं पालन; या कारणांसाठी केला जातो वापर

अंकिता खाणे (Ankita Khane)

गहू किंवा भाजीपाल्याची शेती यासोबत लोक जनावरे पाळतात ते तुम्ही ऐकले असेल. पण जगात एक असा देश आहे जिथे झुरळांची शेती केली जाते.

आपल्या घरात एक झुरळ दिसले तर ते दूर करण्यासाठी आपण विविध उपाय करतो. पण चीनमध्ये झुरळांचे पालन मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.

चीनमध्ये झुरळांचे पालन करून लोकांना चांगला नफाही मिळत आहे. चीनमधील शिचांग येथे त्यांचे पालन केले जाते.

झुरळांच्या निर्मितीसाठी लाकडी घरे बनवली जातात. या घरांचे तापमान कमी असते आणि पुरेसा ओलावा असतो.

तज्ज्ञांच्या मते, ओलसर ठिकाणी झुरळांची वाढ झपाट्याने होते. झुरळांच्या उत्पादनासाठी शेत बांधण्यासाठी लागणारा खर्चही खूप कमी आहे.

चीनमध्ये तयार होणाऱ्या झुरळांचाही अनेक प्रकारे वापर केला जातो. कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यापासून ते सौंदर्य उत्पादनांपर्यंत सर्व गोष्टींसाठी त्यांचा वापर केला जात आहे.

चीन हा दाट लोकवस्तीचा देश आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. झुरळे कचरा खातात आणि त्यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका पोहोचत नाही.

कचऱ्यातून झुरळे नष्ट करण्याचा खर्चही खूप कमी आहे. एवढेच नाही तर झुरळे देखील चीनमध्ये प्रथिनयुक्त आहाराचा भाग बनले आहेत आणि प्राण्यांच्या आहारात त्यांचा वापर केला जातो.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सौंदर्य उत्पादनांपासून औषधांपर्यंत सर्वच गोष्टींमध्ये झुरळांचा वापर केला जातो.

पेप्टिक अल्सर, पोटाचा कर्करोग, त्वचेची जळजळ आणि जखमांवर उपचार करण्यासाठी बनवलेल्या औषधांमध्येही झुरळांचा वापर केला जातो.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea